मा. विश्वस्त
श्री. शरदचंद्र दामोदर मोकाशी आणि श्री. हेमचंद्र लक्ष्मण राजे
श्री. शरदचंद्र दामोदर मोकाशी आणि श्री. हेमचंद्र लक्ष्मण राजे
(डॉ) श्रीमती. कुंदा सुभाष दोंदे
श्री.नितिन यशवंत डोंगरे,
पेणच्या पंचक्रोशीतील श्रीबापुजीबुवा--बापदेव" आजच्या रायगड जिल्ह्यांतील ( पूर्वीचा कुलाबा जिल्हा)" पेण "शहरा पासून (पेण खोपोली रोडवर) साधारणतः सहा किलोमिटर अंतरावर "सावरसई" येथे "पावनगंगा" ओढ्याच्या पूर्वभागी "श्री बापुजीबुवा-बापदेव" यांचे स्थान प्रसिद्ध आहे. एका पुरातन वृक्षाखाली श्री बापुजीबुवा यांचे समाधिस्थ शेंदूर लावलेल्याअवस्थेत हे स्थान असून, ते अत्यंत जागृत आणि जाज्वल्य आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अनेक घराण्यात-कुटुंबांमध्ये "श्री बापुजीबुवा" यांचे चांदीचे टाक "कुलस्वामी - कुलदेव" म्हणून देवाघरांत पूजले जातात. चां. का. प्रभू समाजा बरोबरच ब्राम्हण, सोनार, कासार, कोळी,आगरी आणि स्थानिक मराठा,आदिवासी इत्यादी समाजातील लोकही " श्री बापुजीबुवा" यांचे परमभक्त आहेत. श्री.बापुजीबुवा यांचा उल्लेख शिलाहार राजांच्या शिलालेखांत आढळूनआलेलाआहे.शिलाहार राजांच्या पैकी शेवटचा राजा सोमेश्वर ह्यांची सामूद्रिक राजधानी "घारापुरी" होती. त्यांचा अंमल संपूर्ण कुलाबा (आजचा रायगड जिल्हा) जिल्ह्यांवर होता.शिलाहारांच्या प्रधानमंडळात अनेक चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाची मंडळी कार्यरत होती. शिलाहार राजांचे काही शिलालेख ठाणे कोर्टात ठेवले आहेत. यामध्ये श्री बापुजीबुवा हे सोमेश्वर राजांचे साधूवृत्तीचे धार्मिक गुरू होते असे म्हटले आहे. पुढे चालुक्य राजा पुलकेशी ह्याने स्वारी करून राजा सोमेश्वर यांस युद्धात मारले. त्यावेळी शिलाहार राजांचे पदरी असलेल्या अनेक चांद्रसेनीय कायस्थ कुटुंबांनी परागंदा होऊन कुलाबा (आजचा रायगड जिल्हा)आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आश्रय घेतला आणि त्यावेळी या सर्व कुटुंबियांचा सांभाळ श्री बापुजीबुवा यांनी केला. श्री बापुजीबुवा हे फार मोठे शूर सेनापती होते आणि शिलाहाराचा शेवटचा राजा सोमेश्वर यांच्या पराभवा नंतर श्री बापुजीबुवा यांनी जंगलाचा आश्रय घेतला व सर्वांना त्यांनी वाचविले असा उल्लेख काही ठिकाणी सापडतो.साधारणतः हा कालखंड इ.स. ११oo ते १२oo चा असावा. श्री बापुजीबुवा त्यांना युद्धात विरगती प्राप्त झाल्याने त्यांचे आजचे (सावरसई-पेण) स्थान हे शूरवीराचे स्थान - स्वयंभू वीरगळ - म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना,कुळांना संरक्षण दिले, त्यांचा सांभाळ केला, त्यामुळे श्री बापुजीबुवा यांना दैवत्व प्राप्त होऊन ते आज कुलदेव - कुलदेवता समान "जागृतदैवत" आहेत. रायगड जिह्यांतील उरण तालुक्यांत चाणजे येथे मिळालेल्या शिलाहाराच्या कालखंडातील ताम्रपट व शिलालेख यांमध्ये श्री बापुजीबुवा यांचा उल्लेख आढळतो. निजामशाहीतील सनदपत्रातून सुद्धा श्री बापूजीबुवा या दैवत्वाचा उल्लेख सापडतो आणि तो तसाच पुढे चालू आहे. पेण तालुक्यांतील (जिल्हा-रायगड) सावरसई येथील हे स्वयंभूस्थान श्री बापुजीबुवा यांचे मूळस्थान आहे. या दैवताला "बापदेव" असे मानाने आणि प्रेमाने सुद्धा संबोधले जाते. श्री शंकरांचा अवतार म्हणून प्राचिन काळापासून पूर्वजांची श्रद्धा असणा-या, या देवाला जमीनी इमान देण्यांत आल्या असून, नंदादीप लावण्याची आणि पूजा-अर्चा यांची व्यवस्था करण्यात आल्याच्या नोंदी सापडतात. श्री बापुजीबुवा यांचे दर्शनाने मनाला शांती मिळते,आचार आणि विचारांत शुद्धता येते. माघ कृष्ण नवमी, "रामदास" नवमी यादिवशी श्री बापुजीबुवा यांचा वार्षिक उत्सव असतो. हजारो भाविक या उत्सवास सहकुटुंब उपस्थित असतात. हा देव नवसास पावणारा असल्याने वर्षभर भक्तगण यास्थळावर दर्शनासाठी येत असतात. आजमितीस,श्री बापुजीबुवा देवस्थान - संस्था, सावरसई (पेण) ह्या रजिस्टर, विश्वस्त व कार्यकारी मंडळाचे अधिपत्याखाली श्री बापुजीबुवा यांचे व कालकाई माता यांचे वार्षिकउत्सव आणि संपूर्ण व्यवस्थेचा कारभार पाहिला जातो.
संग्रहित
उत्सवसंग्रहित
उत्सवसंग्रहित
उत्सवसंग्रहित
उत्सव